Header Ads

जत व माडग्याळ येथील जनावरांचा बाजार रद्द 


जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग व

प्रादुर्भाव टाळणे करीता दि.21 ते 31 मार्च या कालावधीत भरणारा जत येथे मंगळवार व गुरूवारी भरणारा तसेच माडग्याळ येथे प्रत्येक शुक्रवारी भरणारा जनावरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे. तसे प्रसिध्दीपत्रक सांगली यांच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.

बाजार बंद आदेशाचे पालण न करणा-या व्यक्ती वर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानन्यात येईल आणी पुढील कार्यवाही करणेत येईल, असे सांगली कृषी उत्त्पन्न बाजार समितीने पत्रकाद्वारे सांगितले आहे.
 


Blogger द्वारे प्रायोजित.