Header Ads

डफळापूर | जिल्हा बँकेत कर्जमाफी समाविष्ट शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

 


डफळापूर,वार्ताहर : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत माफ झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.


जिल्हा बँकेत पहिल्या यादीत परिसरातील सुमारे 875 शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आलेली आहे.त् यांच्या प्रमाणपत्राचे प्रमाणीकरण बँकेच्या वतीने रवीवारी बँकेच्या शाखेत करण्यात आले.यावेळी शेती अधिकारी बी.बी.नागणे,शाखाधिकारी जयाजी शिंदे,सचिव भाऊसाहेब पुजारी,रावसाहेब मदने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुमारे पंधरा शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.बाकीच्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू आहे.शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन शाखा अधिकारी शिंदे यांनी सांगितले.


 

 

डफळापूर ता.जत येथील कर्जमाफीत मिळालेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.