Header Ads

उमदी | अवकाळी पावसाचा उमदी परिसराला तडाका | लाखोचे नुकसान,बेदाणा भिजला : द्राक्ष,डाळींब,गहू,ज्वारीलाही फटका


उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील उमदी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.यात शेडवर टाकलेला लाखोचा बेदाणा भिजल्याने काळा पडणार आहे.तर द्राक्ष,डांळीब बागांन मोठा फटका बसला आहे.सायकांळी पाच व आठच्या सुमारास पावसाने चांगलाच तडाका दिला.मोठ्या प्रमाणात आलेल्या या पाऊसाने ज्वारी,गहू,तूर सह अन्य पिकालाही फटका बसला आहे.उमदी परिसरातील सोनलगी,सुसलाद,माडग्याळ, उटगी,जाडरबोबलाद, सोन्याळ,हळ्ळी,बालगाव परिसरालाही अवकाळीने झोडपले.यावर्षी ऋतुमान नियमित वर्षीप्रमाणे न झाल्याने अनेकांची उशिरा पेरणी झाली आहे. त्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांची ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफूल, तूर, पिके अद्यापि शेतात आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.


तालुक्यात द्राक्ष व डाळींब फळबागांची संख्या जास्त असून या अवकाळी पावसाचा फटका बागायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. त्यामुळे त्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या आंब्याचा बहर चांगल्याप्रकारे आला होता. मात्र या अवकाळी पावसाने फटका बसणार आहे.उमदी परिसरातील या अवकाळीचा सर्वाधिक बेदाणा उत्पादकांना फटका बसला आहे.ऐन भरात असलेल्या परिसरात सुमारे पाचशे टन द्राक्षे सध्या विविध शेडवर बेदाण्यासाठी टाकण्यात आली आहेत.त्यात या अवकाळी पाऊसाने पाणी गेल्याने शेडवरील बेदाण्याचे मोठे नुकसान होणार आहे. भिजलेला बेदणा काळा पडून उत्पादन घटणार आहे.त्याशिवाय काढण्यायोग्य असलेल्या द्राक्ष पिकांनाही पावसाचा दणका बसला आहे.पहिल्या कर्जातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारने काही प्रमाणात कर्जमुक्तीचा दिलासा दिला असला तरी चालू पीक हाता तोंडाला आले असून निसर्गाच्या अवकृपेने तेही हिरावुन जाण्याची शक्यता दिसत आहे.दरम्यान डफळापूर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी झाल्या. 


 


उमदी परिसरातील बेदाणा शेड नजिक अवकाळी पावसाने पाणी गोळा झाले होते. 


Blogger द्वारे प्रायोजित.