Header Ads

संख | आर.के.पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान


 





संख,वार्ताहर : संख ता.जत परिसरात अनेक शिक्षण संस्था उभ्या करून ग्रामीण भागात शिक्षणांची क्रांती घडविणारे माजी सभापती आर.के.पाटील यांना कर्नाटकातील बेंगलूर येथील भारत वर्चुअल युनिवर्सिटीने डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आले.संख सारख्या दुर्लक्षित गावात 1967 साली श्री.शिवलिंग ईश्वर शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी ग्रामीण भागातील गरीब,होतकरू विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची द्वारे खुली केली होती.एल.के.जी,प्राथमिक,माध्यमिक, ज्यू कॉलेजमधून मराठी,कन्नड,इंग्रजी शिक्षणाची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली होती.सन 2018 पासून महाविद्यालय सुरू करून एल.के.जी.ते पदवीधर पर्यत शैक्षणिक संकुल उभारण्याचे काम पाटील यांनी केले आहे.कर्नाटकचा प्रभाव असलेल्या या भोड्या माळावर सुमारे दहा एकर जागेवर्ती हे भव्य शैक्षणिक संकुल उभे केले आहे.या कार्याची दखल घेत यापुर्वीत कर्नाटक विद्यावर्धक संघ धारवाडचा राष्ट्रीय होरनाडू कन्नडिगा,तर कन्नड भाषेचा विकास व वृध्दी तसेच प्रसार केल्याबद्दल कन्नड व सांस्कृतिक साहित्य मंडळ,बेंगलूरचा कर्नाटक राज्य उत्सव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.पाटील यांनी कोल्हापूर एसएससी बोर्डाचे सदस्य,जत पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे.आर.के.पाटीला यांचा पुर्व भागातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पहिली  डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 

 

संख,ता.जत येथील आर.के.पाटील यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले.






 


Blogger द्वारे प्रायोजित.