कंठी | येथे आरोग्य शिबिराचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते उद्घाटन
कंठी येथे आरोग्य शिबिर संपन्न

जत,प्रतिनिधी : कंठी ता.जत येथे श्री.स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवा संस्था सांडगेवाडी आयोजित आरोग्य प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते संपन्न झाले.ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात,अंगावर आजार काढण्याची पध्दत बंद व्हावी,आजारा बद्दलचे अज्ञान दुर व्हावे.वेळेत उपचार याबाबत जागृत्ती व्हावी या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने विविध आजाराची तपासणी व औषध उपचार करून घेतले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,संस्थेचे अध्यक्ष अनुभवकुमार शिंदे,सौ.शुभांगी शिंदे,डॉ.दत्तात्रेय पाटील,संरपच प्रकाश ऐवळे,रवी पाटील,संगिता खरात,नागा घुंगरे,श्रीनिवास पाटील,तुकाराम इरकर,नाना मोटे,बिरा पाटील,शंकर मोटे,बाळू एडके आदी मान्यवर उपस्थित होते. 


 

 

कंठी ता.जत येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना आमदार विक्रमसिंह सांवत,जि.प.सदस्य महादेव पाटील