उमराणी | उपकेंद्राचे वर्षानंतरही कुलूप उघडेना | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 हजार ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात


उमराणी,वार्ताहर : सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती असतांना जत तालुक्यातील उमराणी  येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्र गेल्या वर्षभरापासून कुलूप बंद आहे.कोरोनाच्या धसक्यातही आरोग्य विभाग या उपकेंद्राबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.जवळपास पाच हजार नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आहे.गेल्या वर्षभरापासून या उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी अथवा कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी तक्रार करूनही या उपकेंद्राची साधी चौकशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली नाही.सुसज्ज व नव्याने रंगरगोटी केलेले हे आरोग्य केंद्र फक्त शोभेची वस्तू बनले आहे.शासनाचे लाखो रूपये खर्चून नुसती इमारात काय कामाची असे आरोप ग्रामस्थाचे आहेत.गेल्या वर्षभरापासून कोणीही कर्मचारी न आल्याने या आरोग्य केंद्रास कुलूप बंद आहे.दुदैव्याने बाहेर गावाहून आलेल्या एकाद्या नागरिकामुळे गावात कोरोनाचा फैलाव झाल्यास या जबाबदार कोन असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.सध्या कोरोना संसर्गाची सर्वत्र भीती असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व रुग्णालये खुले ठेवण्यासंदर्भात आदेशीत केल्यांनतरही उमराणी उपकेंद्र मात्र बंद होते.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

 

 

उमराणी ता.जत येथे वर्षभरापासून कुलूपबंद असलेल्या उपकेंद्राची प्रशस्त इमारत