Header Ads

उमदी | मलकारसिध्द यात्रा रद्द होणार | आज बैठकीत निर्णय शक्य


उमदी,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.त्यामुळे उमदीतील मलकारसिध्द यात्रा जवळपास रद्द झाल्यात जमा आहे.या निर्णयाच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी मलकारसिद्ध यात्रा कमिटी अध्यक्ष बाबू सावंत,सरपंच निवृत्ती शिंदे, उपसरपंच रमेश हळके आदींसह ग्रामस्थांशी चर्चा करून यात्रा न भरवण्याचे आवाहन केले आहे.कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर असलेल्या उमदी येथे मलकारसिद्ध देवाची यात्रा भरते. ही यात्रा खिलार जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. येथे चार ते पाच कोटींची उलाढाल होते. जनावरे खरेदीसाठी कर्नाटक,आंध्रप्रदेश, गोवा आदी राज्यातून व्यापारी येत असतात.भाविकही मोठ्या संख्येने येतात.कोरोनाची भीती असल्याने शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी,असे आवाहन उमदी पोलीस

ठाण्याकडून करण्यात आले आहे. हा निर्णय स्वागतार्ह; परंतु ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, शासन यांनी तात्काळ बैठक बोलावून उमदी यात्रेबाबत निर्णय जाहीर करावा,अशी मागणी तालुका पाणी संघर्ष समितीने केली आहे.

 

 

आज निर्णय शक्य 

 

उमदीतील मलकारसिध्द यात्रा महाराष्ट्र कर्नाटकातील प्रसिद्ध यात्रा आहे.येथे जनावराचे मोठे प्रदर्शन भरते.दोन्ही राज्यातील शेतकरी येथे जनावरे विक्रीसाठी घेऊन येतात.त्यांना सुचना मिळणे गरजेचे आहे.बाकी कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भात आज बैठक होणार आहे.त्यात निर्णय घेऊ अशी माहिती जेष्ठ नेते निवृत्ती शिंदे यांनी सांगितले. 

 

Blogger द्वारे प्रायोजित.