Header Ads

रेकार्डवरील 7 गुन्हेगार ताब्यात | जत पोलीसांचे शहरात कोम्बींन ऑपरेशन | अवैध सावकाराविरोधात पुढे येण्याचे पोलिस निरिक्षाचे आवाहन


 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील एका सावकाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका हद्दपार आरोपीच्या शोधासाठी जत पोलीसांनी सोमवारी पहाटे जत शहरात विठ्ठलनगर व उमराणी रोडवरील पारंडी तांडा येथे कोम्बींग ऑपरेशन राबविले.त्यात रेकार्डवरील 7 आरोपींना व काही शाळकरी मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले.लखन चंद्रकांत पाथरूट (वय 30 वर्षे, रा.विठ्ठलनगर,जत),विकास अशोक बनपट्टे (वय 22 वर्षे, विठ्ठलनगर,जत),आकाश अशोक बनपट्टे (वय 23 वर्षे, विठ्ठलनगर,जत),अजय महेंद्र कांबळे अशोक बसपाहे (वय 25 वर्षे, विठ्ठलनगर,जत),सुरेश सोनाप्पा काळे,किसन आप्पा काळे,राजू शामा काळे (सर्व रा.उमराणी रोड पारधी तांडा, जत)अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर 110 अतर्गंत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा,विभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राजाराम शेळके यांच्यासह 4 अधिकारी,25 पोलीसाच्या पथकाने विठ्ठलनगर,उमराणी रोडवरील पारंधी तांडा येथे कोम्बींन ऑपरेशन राबविल्याची माहिती पोलीसांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. 

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,जत पोलीस ठाणे हद्दीतील हद्दपार आरोपी हा सावकारी संदर्भात शहरातील काही रेकार्डवरील गुन्हेगारांच्या विरूध तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता.मात्र यांची कुणकुण लागल्याने काही आजी-माजी नगरसेवकांनी  धमकाविल्याने तो तक्रार न देताच भितीने पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जत पोलीसांनी त्यांच्या शोधासाठी सोमवारी पहाटे 2 ते 5 च्या दरम्यान पोलीस ठाणे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबविले.यात विठ्ठलनगर मधील चर्चमध्ये रेकॉर्डवरील 4 गुन्हेगारासोबत काही

शाळेत शिकणारी मुले मिळून आली. त्यांना ताब्यात घेण्यात आले.उमराणीरोड पारधी तांडा जत येथे केलेल्या कोम्बींग ऑपरेशन दरम्यान 2 वर्षापासून फरारी ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले रेकार्डवरील सुरेश सोनाप्पा काळे,किसन आप्पा काळे,राजू शामा काळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेले सातही आरोपी हे जत पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर प्रभावी अशी

प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

या आरोपींचे सोबत काही शाळकरी विद्यार्थी मिळून आले होते.त्यांच्या पालकांना बोलावून घेत, त्यांना समज देवून विद्यार्थांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू होते.मात्र ते वारवांर पोलीसांना चकवा देत होते.त्यामुळे पोलीस निरिक्षक राजाराम शेकळे यांनी हे कोम्बींन ऑपरेशन राबवित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.यापुढे अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील,असे शेळके यांनी सांगितले.

 

 

अवैध सावकारविरोधात पुढे या 

 

जत पोलीस ठाणे हद्दीतील अवैध सावकाराविरोधात मोहिम उघडण्यात आली आहे.नागरिकांना असे सावकार दबाव टाकत असतील त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.कोणाच्या दबावाची भिती बाळगू नये.

 

राजाराम शेळके, पो.नि.जत

 

 
 


Blogger द्वारे प्रायोजित.