Header Ads

कोरोना | सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिजेल विक्री बंद | जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांचे आदेश |


सांगली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्या अगोदर दक्षता,तात्काळ नियंत्रण व कोरोनो विषाणूचे संसर्ग रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल,डिजेल पंप बंद कऱण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी घोषित केले.कोरोना विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. त्यामुळे त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दि.25 मार्च 2020 पासून ते दि.31मार्च 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे.हा आदेश मोडल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.