Header Ads

संख | प्रा.आ.केंद्रात कोरोना कक्ष स्थापन | बाहेर गावावरून आलेल्या 585 नागरिकांची नोंदणी | आरोग्य विभाग दक्ष


 

संख,वार्ताहर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुर्व भागातील विविध गावात बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांची माहिती आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहेत.संख आरोग्य केंद्राच्या 17 गावात बाहेरून आलेल्या 585 नागरिकांची माहिती मिळविण्यात आली असून सर्वांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

देशभरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने जत तालुक्यातील देश भरात रोजगारासाठी गेलेले सुमारे 5 हजार कुंटुबे तालुक्यात परतली आहेत.यात सर्वाधिक संख्या जत पुर्व भागातील आहे.त्यामुळे संख,उमदी,कोतेंबोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अशा नविन आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यात येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर संख प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती उपलब्ध झाली आहे.यात संख - 58 ,खंडनाळ -68,अंकलगी 18,गोंधळेवाडी -41,दरीबडची -37,लमाणताडा -14, सिध्दनाथ -15,तिल्याळ -59,आसंगी तुर्क -32,धुळकरवाडी -1,मोटेवाडी -34 ,पाडोंझरी -15,पांढरेवाडी -14, जालिहाळ -18,मुचंडी -82,दरीकोणूर -47,बाजार आसंगी -32,असे 585 बाहेरून आलेल्या लोकांची आम्ही नोंद घेतली असल्याची माहिती केंद्राचे सुपरवायझर (H.A.)डी.ए.चुलपर यांनी दिली.

 

कोरोना कक्षाची स्थापना

 

संख प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांसाठी दोन बेडचा कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली.

Blogger द्वारे प्रायोजित.