Header Ads

कोरोना | तुकाराम महाराजांनी सामाजिक बांधिलकी जपली | आता समाजसेवी व्यक्ती, संस्थांनी पुढे येण़्याची गरज


 


संख,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सेवेसाठी स्व:ताचा जिव धोक्यात घालून काम करणारेे आरोग्य कर्मचारी,शासकीय अधिकारी,कर्मचारी,नागरिकांना सुरक्षेसाठी पाच हजार मास्क मोफत वाटप करत चिकलगी मठाचे मठाधिपती हभप.तुकाराम बाबा महाराज यांनी जपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.या भहवाह परिस्थितीत गरीब,कष्ठकरी नागरिकांना मदत करण्यासाठी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.सलग बंदमुळे तालुक्यातील अनेक घटकाची उपासमार होत आहे.

तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूचा फैलाव रोकावा,त्याशिवाय जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गोधळेवाडींचे हभप तुकाराम महाराज यांनी जत तालुक्यात पाच हजार मास्कचे मोफत वाटप केले.प्रांताधिकारी, तहसीलदार,पंचायत समिती,पोलीसांना मास्क देऊन त्यांनी हि मोहिम सुरू केली आहे.

 

समाजहितासाठी बांधिलकी जपण्याची गरज

 

कोरोना विषाणूच्या प्रभाव रोकण्यासाठी सरकार केलेल्या आवाहनानुसार जत तालुक्यातील सर्व दुकाने,व्यवसाय,बांधकामे बंद झाली आहेत.या ठिकाणी काम करणारी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या बंदमुळे रोजीरोटी प्रश्न गंभीर बनला आहे.त्यांना खऱ्या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या माध्यमातून सध्या निंतात गरज असणाऱ्या व सध्या या परिस्थितीत जनतेसाठी काम करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करत आहोत.पुढे अन्य माध्यमातून या परिस्थितीत जनतेला मदत करणार आहोत.आता सामूहिक मदतीची गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील समाजसेवा संस्था,व्यक्तीनी पुढे येऊन अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहन तुकाराम बाबा यांनी केले आहे.


 

Blogger द्वारे प्रायोजित.