Header Ads

जतचा आवाज विधानसभेत घुमला | तालुक्यातील तलाव म्हैसाळ योजनेतून भरा | मराठी शाळा उभारण्याची आ.सांवत यांची मागणी

 

 


 

जत,प्रतिनिधी : राज्याच्या अर्थसंकल्पात जतच्या प्रश्नावर जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आवाज उठवत जतच्या दुष्काळ हटविण्यासाठी व जत तालुक्यात मराठी शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी केली.मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेत आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भाग घेतला.प्रांरभी जतसह राज्यातील सिंचन योजनाना गती देण्यासाठी 10 हजार 35 कोटीच्या निधीची तरतूद केल्याबद्दल 


अर्थमञ्यांचे आभार मानत आमदार सांवत यांनी कळीचा प्रश्न असणाऱ्या जत तालुक्यातील सिंचन योजनाचा प्रश्नावर आवाज उठवला.सध्या तालुक्यातील 69 छोटे,मोठे तलाव सप्टेंबर,ऑक्टोबरला पाऊस पडला तरचं भरतात.मात्र पाऊस अनिश्चित असतो.त्यामुळे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.ती वाढविण्यासाठी किमान पावसाळ्यात तरी सिंचन योजनेतून तालुक्यातील संपूर्ण तलाव भरून न्याय द्यावा,अशी मागणी केली.राज्यशासनाने मराठी भाषेला दिलेल्या अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात कन्नड बाहूल 21 गावात मराठी शाळा उभारण्यासाठी व कर्नाटक सरकारच्या धर्तीवर गणीनाड कन्नड महामंडळाच्या धर्तीवर राज्यशासनाने मराठी शाळासाठी विशेष निधी देऊन जत तालुक्यातील शाळाचा विकास करावा अशीही मागणी आ.सांवत यांनी विधानसभेत केली.त्याशिवाय आमदार निधी वाढविल्याबद्दल व क्रिडा संकूलसाठी निधी दिल्याबद्दल अर्थमंञ्याचे आभार मानले.               


 

शाळाची विज जोडण्यासाठी विशेष निधीची मागणी

 

 

ग्रामीण भागातील शाळा इंटरनेटला जोडण्या अगोदर तालुक्यातील 13 शाळात विज जोडणी व 123 शाळात तोडलेली विज जोडण्यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी आ.सांवत यांनी विधानसभेत केली.


Blogger द्वारे प्रायोजित.