Header Ads

जत | 'कोरोना' बाधित देशातून दोघे जतेत तपासणीत निगेटिव्ह : आरोग्य यंत्रणा सतर्क होणे गरजेचे

 


जत,प्रतिनिधी : कोरोना या विषाणूजन्य रोगाचा भारतासह सर्वच देशानी मोठा धसका घेतला आहे. या संदर्भात रोज वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. चिन येथील वुहान या शहरात या जगाला हादरविणारे विषाणूजन्य रोगाची सुरूवात झाली असून सद्ध स्थितीत या रोगाचे रोगी दोनशे देशामध्ये आढळून येत आहेत.एवढ्या कमी कालावधीत या विषाणू जन्य रोगाने जगव्याप्त केले आहे. चिनने तर या रोगाचा प्रादुर्भाव बघून पंधरा दिवसांतच एक लाख बेडचे हास्पिटल युध्दपातळीवर बनविले. चिनसारख्या प्रगतशील देशाला हे जमले पण आपले काय ? आपण याचा सामना करू शकतो का? कारण आपली सरकारी,प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णालये लगडी आहे.डेंगू,मलेरिया साथीबाबत ते कधी गंभीर नसतात. अशातच कोरोना सारख्या विषाणूजन्य आजाराचा आपली प्राथमिक आरोग्य केंद्रे रूग्णालये कसा सामना करू शकणार हे समजत नाही. जिल्हास्तरावर कोरोना या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु राज्यात पुणे येथील नायडू रूग्णालयात बाहेरील देशाचा प्रवास करून दाखल करण्यात आलेल्या  कोरोना बाधित रूग्णाकडे येथील वैद्यकीय अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यांच्यावर उपचार तर दूरच अशी व्यथा येथील कोरोना बाधित रूग्णाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

जत तालुक्यातील एका गावात व जत शहरातील एका प्रभागात अशा दोन ठिकाणी बाहेरील कोरोना या विषाणू जन्य रोगाची बाधा झालेल्या देशातून आलेले प्रवाशी आल्याने तालुक्यात व शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने या प्रवाशांची तपासणी करून ते निगेटिव्ह असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांना अजूनही पंधरा दिवस शासकीय कोरोना आपत्ती व्यवस्थापन निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले आहे.बाहेरील कोरोना बाधित देशातून आलेले प्रवाशी शासकीय आपत्ती व्यवस्थापन निवारण केंद्रात न जाता आपापल्या घरी कुटुंबासोबत रहात असल्याचे समोर येत आहे.आरोग्य विभागाचे अशा प्रकारच्या रूग्णांना काळजी घेण्याचे आदेश आहेत. त्या कडे सबंधित रूग्ण, त्यांचे कुटुंब तसेच तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दुर्लक्ष करित असल्याने भविष्यात याची किंमत सर्वांना मोजावी लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे बाहेरील कोरोना बाधित देशातून आलेले प्रवाशी यांना प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल होण्यासाठी प्रवृत्त करणे काळाची गरज आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.