जत,प्रतिनिधी : तालुक्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे.जतेत बाहेर देशातून आलेले दोघांना निगेटिव्ह आहे.तरीही खबरदारी म्हणून त्यांना विलगीकरण कक्ष प व पा.प्रशासकीय रुग्णालय सांगली येथे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या भितीचे वातावरण नसल्याचा निर्वाळा प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.जत तालुक्यात परदेशातून आलेलेे प्रवाशी या 
पार्श्वभूमीवर विभागीय अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य विभाग,पोलीस, पंचायत समिती प्रशासनाची बैठक प्रांताधिकारी आवटे यांनी घेतली.'करोना' आजारा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या कोणत्याही स्थितीत हयगय करू नका.बाहेर देशातून आलेल्या इसमांची दररोज तपासणी करण्याचे आदेश दिले.तालुक्यात आलेल्या दोघे करोना निगेटिव्ह आहेत.एकजण संशयास्पद आहे.त्यांची दररोज तपासणी करण्यात येणार आहे.आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत.त्याशिवाय त्याला स्वतंत्र राहण्याच्या सुचना दिल्याचेही प्रांताधिकारी आवटे यांनी सांगितले.बैठकीला तहसीलदार सचिन पाटील, बिडिओ धरणगुत्तीकर, पो.नि.राजाराम शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


जत तालुक्यात या महिन्यात होणारे उत्सव,यात्रा व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.करोना रोगाबाबत पुर्णत: काळजी घेतली जात असल्याचेही प्रांताधिकारी आवटे यांनी सांगितले.