Header Ads

बेदाणाची प्रतवारी ग्रिडिंग करण्यासाठी इस्त्राईलचे तंत्रज्ञान | जत तालुक्यात 15 यंत्रे | बागायतदार शेतकऱ्यांना वरदान










 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बेदाणाची प्रतवारी ग्रिडिंग करण्यासाठी इस्त्राईलच्या तंत्रज्ञानाचे नेटींग मशीन उभा करण्यात आलेले आहेत. आता बेदाणासाठी यांत्रिकीरणाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.तालुक्यात बेदाणा पतवारी करणारी यंत्रे दहाच्या वर गेली आहेत.बेदाण्याची प्रतवारी, ग्रिडिंग करणे स्वच्छता करणे सोपे झाले आहे.एक तासात लहान मशीन एक ते दीड टन व मोठी मशीन दोन ते अडीच टन बेदाणा प्रतवारी करुन स्वच्छ करते.मजुराद्वारे हे बेदाणीची कामे करण्यासाठी चार ते पाच दिवस लागायचे.ते केवळ दोन दिवसात काम पूर्ण होऊ लागले आहे.त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतक-यांना वेळेची व श्रमाची बचत झाली आहे .याचा फायदा शेतक-यांना होत आहे. तालुक्यातील पाच्छापूर,उमदी,बेळोंडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी, करजगी, बोर्गी, सिध्दनाथ,जालिहाळ खुर्द, कोंतवबोबलाद ,दरीकोणूर,बिळूूर, मुचंडी भागात शेतकरी बेदाणा करतो.तालुक्यात तीन हजार बेदाणानिर्मितीचे शेड आहेत. तालुक्यात कोरडे हवामान असल्याने या भागात सुटेखान, हिरवा, पिवळा असा दर्जेदार बेदाणा तयार होतो बेदाण्याची प्रतवारीनुसार दर ठरतात.द्राक्षे शेडवर टाकल्यावर आठ ते दहा दिवसात बेदाणा तयार होतो.

बेदाणा तयार झाल्यावर बेदाणाची प्रतवारी करणे, स्वच्छ करणे,नेटिग करणे, पॅकीग, वजन करणे ही किचकट वेळ खाऊ प्रक्रिया आहे.या प्रक्रियासाठी बेदाणा नेटींग मशीन बसविलेले आहेत. नेटींग मशीन चालविण्यासाठी बिहारातून मजुर आले आहेत.बेदाणाचा हंगाम तीन महिने चालतो.

तालुक्यात पाच्छापूर,बिळूर,उमदी, संख, सिध्दनाथ, मुचंडी, कागनरी, बालगाव,हळ्ळी,सुसलाद, सोनलगी या भागात बेदाणा नेटिंग मशीन आहेत.शेतकरी शेड झाडून नेटीग मशीनवर घेऊन जातो. बेदाणा स्वच्छ केला जातो ग्रिडिग केले जाते.बेदाणाची प्रतवारी केली जाते.त्यामध्ये चांगली मध्यम कनिष्ठ प्रतवारी केली जाते.बेदाणाचे 15 किलो पेटीप्रमाणे वजन केले जाते.पॅकिंग केले जाते.त्यामुळे बेदाणाची काम सहज सोपे झाले आहे.बेदाणाची प्रतवारी चांगली व बेदाणा स्वच्छ होत असल्याने दरही चांगला मिळत आहे. पूर्वी बेदाणा निर्मिती झाल्यानंतर प्रतवारी बेदाणा स्वच्छ करणे ही मुख्य कामे मजुराद्वारे केली जात होती. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी विलंब लागत होता.दरवर्षी कुशल मजुरांची टंचाई भासायाची.कधी मजुर वेळत येत नाहीत. त्यामुळे बेदाणा प्रतवारी आणि स्वच्छ बेदाणा होत नव्हता.याचा परिणाम दरावर होत असे"बेदाणा शेडवर यांत्रिकीरणास सुरुवात केली आहे. यामुळे बेदाणा प्रतवारी ग्रिडिंग स्वच्छ होत असल्याने वेळेची बचत झाली आहे.तसेच चांगली प्रतवारी आणि स्वच्छता पॅकिंग होत असल्याने दरही चांगला मिळतो."  


 

प्रंशात माळी,

बेदाणा उत्पादक शेतकरी.                             

"यावर्षी बेदाणाचे उत्पादन चांगले आहे.पहिल्या टप्यात हवामानाचा फटका बसला.सध्या नेटींग मशीनचा चांगला उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांची प्रंसती आहे. बेदाणाची प्रतवारी दर्जेदार, चांगली स्वच्छता, पॅकिंग ही सर्व कामे एकाचवेळी होत असल्याने शेतक-यांची वेळ व श्रमाची बचत होते."

 

शंकर कोरे,नेटींग मशीन चालक,सिध्दनाथ

 

 

फोटो ओळ :

 

पाच्छापूर (ता.जत) येथे बेदाणा प्रतवारी स्वच्छ करण्यासाठी यंत्रांचा वापर होऊ लागला आहे.
 

 



 



 



 



 




 



Blogger द्वारे प्रायोजित.