Header Ads

बाज | शेततलावात बुडून बालिकेचा मुत्यू | शेततलावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


 

डफळापूर, वार्ताहर : बाज ता.जत येथे चार वर्षीय बालिकेचा आजोबाच्या मालकीच्या शेततलावात पडून मुत्यू झाला.प्रांजल प्रंशात गायकवाड (वय 4,रा.खुजगाव)असे मयत बालिकेचे नाव आहे.घटना शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.याबाबत रात्री उशिरापर्यत जत पोलीसात नोंद नव्हती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,प्रांजल ही बाज येथील आजोबा तम्मा परसू काशिद यांच्याकडे आईच्या नर्सिंग परिक्षेमुळे राहण्यास आली होती.शनिवारी प्रांजलची आई सिमा ह्या जत येथे परिक्षेसाठी गेल्या होत्या.प्रांजल आजी सोबत घरी होती.सकाळी पावनेदहाच्या सुमारास प्रांजल व शेजारची लक्ष्मी बंडगर(वय 3 वर्षे)खेळत होत्या.आजी घरातील कामकाज करत होत्या.तेवढ्याच प्रांजल व लक्ष्मी खेळत घराजवळच्या शेततलावाच्या बांधावर गेल्या.प्रांजलचा पाय घसरून ती पाण्यात पडली.लक्ष्मीही तिला वाचविण्यासाठी पाण्यात उतरली.तेवढ्यात शेजारच्या महिलेच्या लक्षात हा प्रकार आला.तिने आरडाओरडा केला.जवळच असणाऱ्या गणेश जाधव यांने तलावात उतरत प्रांजल व लक्ष्मी पाण्याबाहेर काढले.प्रांजल बराच वेळ पाण्यात बुडाल्याने बेशुध्द पडली होती.तिला तातडीने कवटेमहाकांळ येथे उपचारार्थ नेहत असताना तिचा वाटेत मुत्यू झाला.

डफळापूर पर्यत प्रांजल हिच्या शरीराची हालचाल सुरू होती.मात्र डफळापूर प्राथमि केंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्याने तिला कवटेमहाकांळ येथे नेहावे लागले.कदाचित डफळापूर येथे डॉक्टर उपस्थित असते.तर प्रांजलचे प्राण वाचले असते,असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.दरम्यान घरालगतच्या शेततलावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा या घटनेच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 


Blogger द्वारे प्रायोजित.