Header Ads

कोरोना : जतेत कडक उपाययोजना | औषधे फवारणी | अत्यावश्यक दुकानाच्या वेळा निश्चित | भाजीपाला,दुध घरपोच मिळणार |

 


 

जत,प्रतिनिधी : जत शहरात कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी प्रतिबंधित जंतूनाशक फवारणीसह गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक दुकानाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.नगरपरिषदेने गतीने उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कोरोना रोकण्यासाठी कार्यरत करण्यात आले आहेत.भविष्यातील गर्दी रोकण्यासाठी किराणा,दुध,कृषी दुकाने या अत्यावश्यक दुकानाच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत.त्याशिवाय दुध भाजीपाला घरपोच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सर्वांनी एक मीटर अंतर ठेवण्याबरोबर मास्क सॅनीटायझरचा वापर करावा.भविष्यात करोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी नगरपरिषद सतर्क आहे.सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.शहरातील प्रमुख चौक,सार्वजनिक ठिकाणे रस्त्यावर ट्रँक्टर द्वारे औषध फवारणी केली जात आहे.अत्यावश्यक दुकानाच्या वेळाही ठरविण्यात आल्या आहेत.दुध,भाजीपाला सकाळी 8 ते 12 या वेळेत घरपोच करण्याचे आदेश दिले आहेत.किराणा दुकाने सकाळी 10 ते 2 सायकांळी 6 ते 8 कृषी दुकाने सकाळी 10 ते 12,सायकांळी 6 ते 8 दुध संकलन सकाळी 7 ते 9,सायकांळी 6 ते 8 गर्दी टाळावी असे आदेश आहेत.


महत्वाचे ::

कोरोना व्हायसर संबंधीचे सर्व नियम शहरात लागू करण्यात आले आहेत,अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यवसायीकांनी आपला व्यवसाय करित असताना गर्दी न करता प्रत्येक नागरीकांमध्ये एक मीटर अंतर ठेवूनच सुचना व व्यवहार करणेचे आहे.तोंडाला रुमाल मास्क व सॅनीटायझरचा वापर करण्यात यावा.

 

 

आदेश पाळा,स्व:ताला जपा

 

करोना विषाणूचा फैलाव गतीने होत आहे.त्यामुळे भविष्यात जतमध्ये गंभीर परिस्थिती होऊ शकते.त्यामुळे संचारबंदी पाळा,गरजेशिवाय घराबाहेर पडू नका.अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आम्ही दुकानदारांना वेळा ठरवून दिल्या आहेत.तेथेही गर्दी करू नका,दुध भाजीपाला घरपोच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या निरोध आरोग्यासाठी नगर परिषद,प्रशासनाला सहकार्य करा.

 

अभिजित हराळे

मुख्याधिकारी,जत नगरपरिषद 

 Blogger द्वारे प्रायोजित.