Header Ads

लाडग्याच्या हल्ल्यात पाचजण जखमी : मुंचडी,रावळगुंडेवाडी परिसरातील घटना


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मुंचडी,पाच्छापूर,रावळगुंडेवाडीत पिसाळलेल्या लांडग्याने पाच जणावर हल्ला करत गंभीर जखमी केले.लाडग्याच्या हल्ल्यात शेतमजूर काशिनाथ बारकू पवार,(वय 30,रा रायगड),मेढीराखे सिद्राया हणमंता मलमे (वय 60),भरमाण्णा मायाप्पा भंगी (वय 28,दोघे रा मुंचडी)असे जखमी झाले आहेत.अन्य दोघापैंकी एक रावळगुंडेवाडीचा तर एक शेतमजूर आहे.त्यांची नावे समजू शकली नाहीत.घटना रवीवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.






घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,रावळगुंडेवाडी परिसरात शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला.आरडा ओरडा झाल्याने नजिकचे लोक जमा झाले.लाडग्यांला तेथून हूसकावून लावले.तसा धावत आलेल्या लाडग्यांने पाच्छापूर नजिकच्या ओढापात्रा मेंढराच्या कळपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.कळपात असलेल्या कुञा भुंकत पुढे आल्याने लांडग्याने त्यालाही चावा घेतला.दरम्यान पुढे पळत आलेले मेढीराखणारे सिद्राया मलमे,भरमाण्णा भंगी यांच्याही लांडग्याने हल्ला केला.त्यात दोघे गंभीर जखमी झाले.काही अंतरावर असल्याने सचिन विठ्ठल शिंदे (वय-17,रा.मुंचडी) हा मेंढीराखा वाचला.हल्ल्यानंतर मेंढीराख्यानी हुसकावल्याने लांडग्याने तेथून पळ काढला.पुढे काही अंतरावर काम करत असलेले मजूर काशिनाथ पवार

यांच्यावर लांडग्याने हल्ला केला.त्यांच्या डोक्यास चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.जखमीवर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान घटनास्थंळी परिमंडल वन अधिकारी मुंचडी विभाग एस.के.गुगवाड 

यांच्यासह ग्रामस्थांनी लांडग्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही.दरम्यान लांडग्याचा आम्हची टीम शोध खेत आहे.त्याला पकडेपर्यत मेंढीराखे,पशूपालक,शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन गुगवाड यांनी केले आहे.

 

 





Blogger द्वारे प्रायोजित.