Header Ads

अंकलगीत सुरू होणार जत तालुक्यातील पहिला टँकर | तीन गावांची मागणी  | 23 गावात टंचाई,प्रशासनाची तयारी 


 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पहिला टँकर सोमवार पासून सुरू होण्याची शक्यता आहे.तीव्र पाणी टंचाई असलेल्या अंकलगी,सोन्याळ,गोधळेवाडीचे टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजूरीला गेले आहेत.त्यापैंकी सर्वाधिक पाणी टंचाई असलेल्या अंकलगीला पहिला टँकर सोमवार पासून सुरु होण्याची शक्यता आहे.
जत तालुक्यातील 23 गावात मान्सून रिटर्नचा अपेक्षित पाऊस झालेला नाही.ती गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत.सध्या या गावातील पाणी पातळी खालावली आहे.त्यामुळे मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्या पर्यत टँकरची संख्या वाढणार आहे.दर वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची वेळ प्रशासनावर येत आहे.पाणी फांऊडेश,नाम फाऊडेंशन,जैन संघटना,रोहयोमधून तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत.2018 मध्ये जवळपास टँकर मुक्ती झाली होती. मात्र पुन्हा यावर्षी या भागात पाऊस अपेक्षित पडला नाही.त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.संध्या टंचाईग्रस्त 23 गावापैंकी तीन गावाचे टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.त्यातील अंकलगीचा टँकर सोमवार,मंगळवार पर्यत प्रांरभी सुरु होणार आहे.तशा पध्दतीने आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी सांगितले.

 

 

टंचाईग्रस्त गावांना पाणी देण्यास प्राधान्य

 

जत तालुक्यातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.टँकरची मागणी असलेल्या तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.त्याशिवाय विहिरी,कुपनलिका अधिग्रह बोअर दुरूस्ती करण्याची काम तातडीने करण्याच्या सुचना दिल्या आहे.

 

प्रंशात आवटे,विभागीय अधिकारी 
 


Blogger द्वारे प्रायोजित.