Header Ads

येळवी | येळवीतील फॅशन डिझाईनिंग कोर्सेसची सांगता | ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था यांचा उपक्रम


 





येळवी,वार्ताहर : ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था येळवी व नेहरू युवा केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सुुरू असलेल्या मोफत फॅशन डिजाईनिंग कोर्सेची यशस्वी सांगता झाली.

सहभागी 50 महिलांचा प्रॅक्टीकल पेपर घेण्यात आला. सर्वच महिलांनी त्यांना दिलेले काम अगदी काटेकोरपणे पार पाडले.विविध प्रकारचे फॅशनचे ब्लाऊज, वेगवेगळे ड्रेस शिऊन आपल्यातल्या कलेला वाव देत यश संपादन केले.यावेळी संस्थेचे सचिव तथा ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील म्हणाले की, ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक अनिल अंकलगी यांच्या कल्पनेतुन ग्रामीण भागातील स्त्रियाना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रशिक्षणाची सोय ओंकार स्वरूपातर्फे करण्यात आली.महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत,आपला उदार निर्वाह तिला स्वतःला करता यावा व तिला सन्मानाने जगता आले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा मोफत फॅशन डिजाईनिंग कोर्से येळवी परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.

महिलांनी या प्रशिक्षणात हिरारीने सहभाग घेत व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण केला.

प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर सहभागी महिल्या म्हणाल्या,आम्हाला ओंकार स्वरूपा संस्थेचे सक्षम बनविण्याचे काम केले आहे. कुंटुबाच्या उदरनिर्वाहात आमच्या या व्यवसाय प्रशिक्षणामुळे आर्थिक हातभार लावणे शक्य होणार आहे.संस्थेने महिलांनी शिवलेल्या कपड्याचे प्रर्दशन भरवले होते.हे प्रदर्शन पाहण्यासाठी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गावातील लोकांनी महिलांचे कौतुक केले.यावेळी मंजूषा वैष्णव,शुंभांगी साबळे(हंगिरगे),योगिता शिंदे,सुषमा साबळे(हंगिरगे),अश्विनी चव्हाण (हंगिरगे),स्वाती गानमोटे आदि महिलांची भाषणे झाली.येळवीचे उपसरपंच सुनिल अंकलगी,जत कृषि विभागाचे कृषी सहाय्यक श्री. राख साहेब,आनंदा क्षिरसागर,पत्रकार मारूती मदने,संतोष पोरे,शिवाजी आवटे,संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी,सचिव संतोष पाटील, तुकाराम सुतार,नवनाथ पवार,विजय पाटील,भारत तेरवे,मेजर नवनाथ तेरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

येळवी ता.जत येथे आयोजित फॅशन डिझाईनिंग कोर्से यशस्वीरित्या सांगता करण्यात आली.

 

 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.