उमदी,वार्ताहर : भिवर्गी-करजगी रस्त्यावर झालेल्या ट्रँक्टर अपघातात कर्नाटकातील एकजण ठार झाला.विश्वनाथ अप्पासाहेब बिराजदार वय 31,रा.चिमणीगाव,ता.इंडि,जि.बिजापूर,सध्या रा.भिवर्गी)असे ठार झालेल्याचे नाव आहे. बुधवारी सायकांळी साडेसहाच्या दरम्यान घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मुळ कर्नाटकातील असणारे विश्वनाथ बिराजदार अनेक वर्षापासून भिवर्गीत राहत होते.बुधवारी ते कामानिमित्त भिवर्गी-करजगी रस्त्यावरून ट्रँक्टर घेऊन जात असताना अपघात झाला.त्यात बिराजदार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.त्यांना जत येथे उपचार्थ आणत असताना त्यांचा मुत्यू झाला.जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.याबाबत उमदी पोलीसात वर्दी देण्यात आली आहे.