Header Ads

'कोरोना' | संखमध्ये बेकायदा जादा किंमतीने मास्क विक्री |


 

 

संख,वार्ताहर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संख परिसरात जादा किंमतीने बेकायदा मास्क विक्री सुरू असल्याची चर्चा आहे.काही पान शॉप व स्टेशनरीमधून असे मास्क 30 ते 50 रूपयाला विक्री केली जात अयल्याचे समोर येत आहे.राज्यभरात कोरोना विषाणूचा मोठा फैलाव झाला आहे.त्यांचे लोण ग्रामीण भागापर्यत पोहचली आहे.यांचा लाभ घेण्यासाठी काही दुकानदारांनी मास्क विक्रीचा धंदा उघडला आहे.कर्नाटकातून 2 ते 5 रूपयाला मिळणारे मास्क बेकायदा 30 ते 50 रूपये असे जादा किंमतीने विक्री केली जात असल्याची चर्चा आहे.अशा विक्रेत्याची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 


Blogger द्वारे प्रायोजित.