Header Ads

मुर्दाड : दारू,मावा,गुटखा विक्रेत्यांवर छापामारी | बेवनूर,जतेत : LCB ची कारवाई


 

जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणुचा प्रभाव रोकण्यासाठी एकीकडे प्रशासन जीव धोक्यात घालून प्रयत्न करत असतानाही तालुक्यातील मुर्दाड दारू,गुटखा,मावा विक्रत्यांनी जनाची ना मनाची लाज न बाळगता आपले धंदे घरातून सुरु ठेवले आहेत.अशा बेजाबदार दुकानदारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाईचा दणका देण्यात आला आहे.गुरूवार सायकांळी बेवनूर येथे छापा टाकत पथकांने बेकायदा जमा केलेल्या दारूचा साठा जप्त केला आहे.आज शुक्रवारीही जत शहरातील अशा काही मुर्दाड दुकानदारावर पथकांकडून कारवाई करण्यात आली आहे.देशभरात कोरोना विषाणुचा फैलाव जीवघेणा ठरत आहे.प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गुटखा,मावा व दारूची दुकाने बंद करण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत.मात्र या मुर्दाड दुकानदारांनी आता घरातून दुकाने थाटली आहेत.औशी मद्यपी शौकीनां आता त्याच्यां घरी वावर वाढला आहे.यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्याशिवाय जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.कहर केलेल्या या दुकानदारांवर कारवाईचा दडूंका पोलीसांनी उचलला आहे.जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


 


पिचकाऱ्या माऱणारेही रडारवर


 


जत तालुक्यातील जत शहरासह डफळापूर सह ग्रामीण भागातील बेकायदा मावा,गुटखा विक्रेते पोलीसांच्या रडारवर आले आहे.संचारबंदीत दुकाने बंद असतानाही हे दुकानदार घरातून गुटखा,मावा विकत आहेत.तर विकृत्त व्यसनी औशी मंडळी सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारत आहेत.आता हे पिचकाऱ्या मारणारे नागरिक शोधले जात आहे.त्यांच्या माध्यमातून या विक्रेत्यापर्यत मुसक्या आवळल्या जात आहेत.बंद दाराआडून परवाना धारक दुकानातून दारू विक्री केली जात आहे. हे दारू विक्रेतेही पोलीसांच्या रडारवर आहेत.


Blogger द्वारे प्रायोजित.