Header Ads

सांगली | परदेशवारीवरून आलेले 685 व्यक्ती होम क्वॉरंटाईन,20 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये


सांगली : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 978 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 75 व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 51 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 24 जणांचे स्वॅब टेस्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यापैकी एक व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील आहे. इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 20 व्यक्ती असून होम क्वॉरंटाईन असलेल्या 883 व्यक्तींपैकी 198 व्यक्तींचा 14 दिवसाचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.  सद्यस्थितीत 685 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आली.


Blogger द्वारे प्रायोजित.