Header Ads

कोरोना : जतची रुग्णालये व आरोग्य केंद्रांना साहित्य खरेदीसाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी निधी द्यावा : सुनिल पवार


जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रभाव रोकण्यासाठी जत तालुक्यातील रुग्णालये व आरोग्य केंद्रांना साहित्य खरेदीसाठी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आमदार निधीतून निधी द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी केली आहे.पवार म्हणाले, कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या डाॅक्टरांना फेसमास्क,ग्लोव्हज,सॅनिटायजर यांची टंचाई जाणवत आहे ,त्यामुळे ही साधने विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास निधीतून खरेदी करण्याची मुभा महाराष्ट्रातील सर्व आमदारांना देण्यात आली आहे.प्रत्येक आमदाराला 50 लाख रूपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली असून त्यातून सर्वसामान्य जनतेसाठी इन्फ्रारेड थर्मामीटर थर्मामीटर,कोरोना टेस्टींग कीटस,व्यक्तीगत सुरक्षा साधने,व्हेंटीलेटर यांचीही खरेदी करता येईल.आमदारांनी दिलेल्या पत्राच्या आधारे ही यंत्रसामग्री आणि साधने खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीस देण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.पवार पुढे म्हणाले,जत तालुक्यातील आरोग्य केंद्राना कोरोना प्रभाव रोकण्यासाठी या साहित्यांची मोठी गरज आहे.त्यामुळे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी यासाठी आपल्या आमदार निधीतून तालुक्यातील आरोग्य केंद्राना निधी द्यावा अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीचा सामना करण्यासाठी,आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 50 लाख रूपयांचा निधी जत तालुक्यातील डफळापूर,बिळूर,शेगांव,येळवी,वळसंग,संख,कोंतेवबोबलाद व उमदी येथील 8 प्राथमिक आरोग्यकेंद्रातील,तसेच जत व माडग्याळ येथील ग्रामीण रूग्णालयांतील डाॅक्टर,नर्स व इतर कर्मचारी यांच्यासाठी सुरक्षा साधने तसेच जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी कोरोना टेस्टकीटस,मास्क,सॅनिटायजर,व्हें टीलेटर,इत्यादींची खरेदी करता येईल.तरी लवकरात लवकर आमदार सांवत यांनी 50 लाख रूपयांच्या निधीसाठी जिल्हाधिकार्‍यांना पत्र द्यावे ही विनंती भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील रा.पवार,जत शहराध्यक्ष आण्णा भिसे,युवा अध्यक्ष कुमार कोळी व अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सद्दामभाई आत्तार यांनी केली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.