Header Ads

कोसारी | अवैध धंद्याला ऊत | तरूणाई व्यसनाच्या आहारी


 




कोसारीत काळ्या धंद्याला ऊत

बहुसंख्य तरूणाई व्यसनाच्या आहारी

 

कोसारी,वार्ताहर : मौजे कोसारी,ता.जत येथे काळ्या धंद्याला ऊत आला असून बहुसंख्य तरूणाई व्यसनाच्या आहारी जात आहे.जत पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसारी गावामध्ये बेकायदेशीर काळ्या धंद्याला ऊत आला आहे.गावात आठ दारूचे अड्डे चालू असुन एक-दोन छुप्पा तीन पानी अड्डा चालू असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.आजची तरूणाई म्हणजे उद्याचा भारत असुन पोलिस अधिकारी व राज्य उत्पादक शुल्क विभागीय अधिकारी अर्थ पुर्ण पणे दुर्लक्ष करत आहेत.येथील बहुसंख्य तरूण वर्ग आणि स्थानिक लोकांची पाचवीला पुजलेली गरीबी आणि व्यसनाधीनता कायम वाढत चालली असल्याने वरीष्ठ पदाधिकारी व आधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी सर्व सामान्य जणमाणसातुन होत आहे. 

दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असुन ऊस तोड हा प्रमुख व्यवसाय झाला आहे. येथे परगावहुन येतात काही हावशी-नवशी त्यामुळे येथील स्थानिक तरूण देशोधडीला लागला आहे. या सर्व कारणातून व्यसनाधीनता वाटचाल सुरू आहे.राजरोसपणे सुरू असलेले हे काळे व्यवसाय तात्काळ बंद करावेत अशी मागणी होत आहे.

 

      




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.