Header Ads

जत | उच्चशिक्षणाने माणूस समृद्ध होतो : डॉ सागर डेळेकर | राजे रामराव महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण


 
उच्चशिक्षणाने माणूस समृद्ध होतो : डॉ सागर डेळेकर

 

राजे रामराव महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितर

 

 

जत, प्रतिनिधी: उच्चशिक्षित होणे आता या स्पर्धेच्या युगात शिक्षण हे विकास व परिवर्तनाचे मुख्य साधन बनले आहे. देशात  गांधी नेहरू,फुले, शाहू,आंबेडकर तसेच शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी दर्जेदार व मोफत शिक्षणावर भर दिला. सामाजिक समता व आर्थिक प्रगतीसाठी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.शिक्षणाचे उद्दिष्ट,अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्था व त्याचे राष्ट्रीय विकासाशी असलेले अनुबंध काय असावेत, यावर सविस्तर मांडणी केली आहे, असे प्रतिपादन डॉ सागर डेळेकर यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.अक्षय सरवदे तर संस्था प्रतिनिधी म्हणून विभागप्रमुख, सांगली जिल्हा,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापुरचे प्राचार्य व्ही एस पाटील उपस्थित होते.प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. करिष्मा शिंदे, रेखा कोट्टलगी, विजयालक्ष्मी तेली, गणेश चव्हाण, सरिता सावंत, अस्मिता भोसले, गौरी जेऊर, समाधान वाघमोडे, अश्विनी कोळी, श्रेया वाळवेकर, सुजाता पाटील, ज्योती बनकर, गौरी कलाल, पुजा कोळी, श्रुतीका क्षीरसागर, मांतेश माळी, अमोल शिंदे, काजल गावडे व शाहीन पाटील

या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

डॉ अक्षय सरवदे म्हणाले, शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे मानवात खुप मोठया प्रमाणावर बदल झाले असून मानवाला यामुळे आपल्या हक्कांचे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली आहे. 

व्ही एस पाटील म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांच्या त्यागातून हे महाविद्यालय 1969 साली सुरू झाले. आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत या महाविद्यालयाने लाखो विद्यार्थी घडविले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा रामदास बनसोडे यांनी तर आभार प्रा कृष्णा रानगर यांनी व्यक्त केले. 

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.