Header Ads

कोरोना : जत तालुक्यातील मजूरांना मदत करावी | प्रकाश जमदाडे यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

 


जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुकारलेल्या बंदमुळे जत तालुक्यातील शेतकरी,कष्ठकरी, शेत मजूर,ऊसतोड मजूर,सह शेवटचा घटक आर्थिक अडचणीत आला आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल सुरू आहे.त्यामुळे शासनाने दुष्काळी जत तालुक्याला खास बाब म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या बाबत सरकार करत असलेल्या उपाय योजना कौतुकास्पद आहेत.तालुक्यातील सर्व घटकातील नागरिकांनी यात सहभाग नोंदविला आहे.गेल्या चार दिवसापासून पुढे वीस -पंचवीस दिवसाचा काळ कसोटीचा आहे.त्यामुळे पुढे 21 दिवस संचारबंदीचे असणार आहेत.तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाही झोकून देऊन काम करत आहेत.त्यामुळे तालुक्यातील जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारे गतीने सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.मात्र दिर्घकाळ व्यवहार बंद राहणार असल्याने तालुक्यातील हातावर पोट असणारे सुमारे 50 हजार कुंटुंबाचा रोजगार बंद झाला आहे.त्यांच्यापुढे जीवन जगण्याचा मोठा प्रश्न उभा टाकला आहे.तालुक्यासह देशभरात बंद झालेले उद्योग, व्यवसाय,साखर कारखाने यामुळे तालुक्यातील रोजगारासाठी बाहेर असणारे मजूर तालुक्यात परतले आहेत.या सर्वाची संख्या 50 हाजारावर आहे.त्यांची रोजगार नसल्याने उपासमार होत आहे.त्यामुळे शासन स्तरावरून जत तालुक्याला विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करावी,असे निवेदनात जमदाडे यांनी म्हटले आहे.निवेदनाच्या प्रती अर्थमंत्री अजित पवार,जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनाही देण्यात आल्या आहेत.

 

या आहेत मागण्या...

 


  • 1) कामगारांना 20 तारखेपासून बंद संपेपर्यत मार्च पर्यंत प्रति दिवस 300 रुपये प्रमाणे भत्ता द्यावा किंवा प्रति माणसी 5 किलो तांदुळ व 5 किलो गहू द्यावेत

  • 2) शेतकरी दुकानदार व सर्व कर्जदार यांना कर्ज व्याज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी.  • 3) छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक यांचे जी.एस.टी व इतर शासकीय देणी कार्यालयात भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी.  • 4) कॅश क्रेडीट,वाहन कर्ज (बँका वित्तसंस्था किंवा फायनान्स) इतर सर्व कर्जे व बचत गटाकडील कर्जे इत्यादी वसुलीस मुदतवाढ द्यावी.


 

Blogger द्वारे प्रायोजित.