Header Ads

जत | वसुलीअभावी ग्रामपंचायतीची वीज बिले भरण्यास विलंब


 

वसुलीअभावी ग्रामपंचायतीची वीज बिले भरण्यास विलं

जत,प्रतिनिधी :वीज वितरण कंपनीकडून ग्रामपंचायतींना मासिक बिल येत असल्याने या मासिक बिलाने ग्रामपंचायती हैराण झाल्या आहेत. ग्रामीण भागातून घरफाळा, पाणीपट्टी वेळेत वसूल होत नसल्याने ग्रामपंचायतींना याचा जोरदार फटका बसत असून वेळेत वीज बिल भरले नाही तर तसेच सध्या मार्च एंड असल्यामुळे काही ग्रामपंचायतीचा नळ पाणीपुरवठा कनेक्शन तोडण्याचा सपाटा वीज वितरण कंपनीने लावला असल्याने पिण्याचा पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे.ग्रामीण भागात हाताचा बोटावर मोजण्याइतक्याच ग्रामपंचायती आर्थिक उत्पन्नातून सक्षम आहेत. बहुतांशी ग्रामपंचायती केवळ कराच्या माध्यमातून चालविणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील सामान्य गरीब कुटुंबे ग्रामपंचायतीचा घरफाळा, पाणीपट्टी, वेळेत भरू शकत नाहीत. ग्रामपंचायतीचे कर्मचारी फाळा वसुलीस जातात; मात्र ग्रामीण भागातून म्हणावा तसा त्यांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा वसुलीचा आकडा दिवसेंदिवस फुगत चाललेला दिसून येत आहे. वेळेवर वसुली होत नसल्याने सध्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. प्रत्येक नागरिकाला पाण्याची दररोज गरज असते आणि त्याची पूर्तता करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असते याचा विचार करून शासनानेदेखील लाखो रुपयांचा नळ पाणी योजना दिल्या आहेत. या नवीन योजनेतील 
हायमस्ट लाईट,नळपाणी योजनेसाठी असणारे वीज पंप जादा हॉर्सपॉवरचे असल्याने ग्रामपंचायतींना वीज बिलाचा तोटा सहन करावा लागत आहे.गावातील जमणारे कर व येणारे वीज बिल याचा मेळ बसत नसल्याने उत्पन्न कमी, खर्च जादा अशी बिकट अवस्था ग्रामपंचायतींची झाली आहे. वीज वितरण कंपनी बिल थकल्यानंतर थकलेल्या रकमेवर व्याज दंडाची आकारणी करते. त्यामुळे वीज बिल व दंड आकारणीमुळे ग्रामपंचायती तोट्यात चालल्या असून याबाबत वीज वितरण कंपनीने पूर्वीप्रमाणे बिल आकारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.