Header Ads

जत |तालुक्यात अवकाळीने ज्वारीला फटका


 
जत तालुक्यात अवकाळीने ज्वारीला फटका

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात उकाडा सुरू झाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी जत तालुक्यात रविवारीपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले. यामुळे द्राक्षे, ज्वारी, गहू, डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला असून, मोठे नुकसान झाले आहे.रिमझिम पावसासह गारांच्या पावसामुळे सर्वाधिक फटका हा द्राक्षांना बसल्यामुळे द्राक्ष बागायतदारांसह ज्वारीची पिके घेतलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे.फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा लागत होत्या, तर दुसरीकडे शेतकऱयांसाठी सुगीचे दिवस असून, काही ठिकाणी ज्वारी काढणीस प्रारंभ झाले आहेत, तर द्राक्ष ,बेदाणा बागायतदारांची पिके काढणीला आली असतानाच अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱयांची अक्षरशः धांदल उडालेली होती. शेतकऱयांनी शेतात ज्वारी काढून ठवेली असून, काही ठिकाणी पावसाने भिजून मोठे नुकसान झाले आहे.शहराऐवजी जिह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे.
 


Blogger द्वारे प्रायोजित.