Header Ads

जत | तालुक्याचे विभाजन करा | आ.विक्रमसिंह सांवत यांची विधानसभेत मागणी | विज वितरण,रस्ते,पोलीस वसाहतीसाठी निधीचीही मागणी
 

जत,प्रतिनिधी : 126 महसूली गावे व 1240 वाड्यावस्त्या एवढ्या विस्तीर्ण कायमस्वरूपी दुष्काळी जत तालुक्याचे विभाजन करावे अशी मागणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी विधानसभेत केली.जत तालुक्याचे वास्तविक पाहता यापुर्वीची विभाजन होणे गरजेचे होते.मात्र 2009 पासून असलेल्या या मागणीला संख येथे अप्पर तहसील कार्यालय करून तत्कालीन सरकारने फक्त तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.जेथे अप्पर तहसील कार्यालय झाले आहे.तेथे नाममात्र कामे होत आहे.इतर कामासाठी 50 ते 90 किलोमीटरील अंतरावरील गावातून नागरिकांना जत तहसील कार्यालयात यावे लागत आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होत आहे. त्यामुळे पुर्वीपासून मागणी असलेल्या संख,माडग्याळ, उमदी या गावांच्या प्रस्तावावर विचार करून या दुष्काळी तालुक्याचे विभाजन करावे,अशी मागणी आ. सावंत यांनी केली.तालुक्यात विज समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.वीज सुरळीत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी अनामत रक्कमा भरूनही विज कनेक्शन जोड़णी केलेली नाही.त्याशिवाय अंकले,देवनाळ सब स्टेशनचे काम रखडले आहे.तालुक्यातील विज यंत्रणा कालबाह्य झाल्या आहेत.त्या बदलाव्यात.अशी मागणी केली.त्याचबरोबर जत तालुक्यातील विविध 2052 किलोमीटरच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी विशेष निधी मिळावा.उमदी व जत पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने जीर्ण झालेली आहेत.ती नव्याने बांधावित अशी मागणी आ.सावंत यांनी विधानसभेत केली.अर्थसंकल्पीय या अधिवेशनात आ.सांवत यांनी नव्याने विधानसभेत जाऊनही तालुक्यातील प्रंलबित प्रश्न प्रभावीपणे मांडत सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.