Header Ads

एकुंडी | ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी | आरोग्य तपासणी | कोरोना जनजागृती समिती स्थापन       


जत,प्रतिनिधी : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायत येथे सरपंच बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून परगावाहून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.


एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच बसवराज पाटील कोरोना विषाणूचा प्रभाव रोकण्यासाठी सतर्क झाले आहेत.त्यांचाच भाग म्हणून संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.गावातील गर्दीची ठिकाणे, ग्रामपंचायत परिसर, प्रमुख देवालया समोर, प्रमुख रस्ते, चौक आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली.


यावेळी ग्रामसेवक आर.के.माळी, तलाठी थोरात,आरोग्य सेवक श्री.माने,कृषीसहाय्यक श्री बसरगी,सर्व अंगणवाडी सेविका, आशासेविका उपस्थित होते.ग्रामपंचायतचे क्लार्क संतोष कोंडे, डाटा ऑपरेटर महांतेश म्हेत्रे, ग्रामपंचायत शिपाई पिरगोंडा मगदूम यांनी निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामामध्ये सहभाग घेतला.गावातील ग्रामस्थांनी लॉकडाऊनच्या काळात घरीच बसावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावे असे आवाहन सरपंच पाटील यांनी केले आहे.


   


Blogger द्वारे प्रायोजित.