Header Ads

कोरोना | संसर्ग रोकण्यासाठी शौच्छालयाचा वापर करावा ; भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांचे आवाहन |


जत,प्रतिनिधी : देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव प्रचंड वेगाने होत आहे.त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे.त्यांचाच एक भाग असणारे स्वच्छालयाचा तालुक्यातील नागरिकांनी वापर करावा,कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये,त्यामुळेही कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे,अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी दिली आहे. 

पवार म्हणाले,आपल्या गावांत एखादा मनुष्य कोरोनाबाधित असेल,आणि त्याने उघड्यावर शौच केला असेल,त्या शौचावर माश्या बसून,त्या माशांपासून कोरोना विषाणूचा प्रसार गावांमध्ये होवू शकतो.तसेच एखाद्या म्हैशीने ते शौच खाल्ले तर ती म्हैससुद्धा कोरोनाबाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्या म्हैशीच्या दुधात विषाणू उतरू शकतात.वरील गोष्ट जरी किळसवाणी असली तरी आपल्या तालुक्याची ती वस्तुस्थिती आहे,हेही समजले पाहीजे.म्हणून उघड्यावर शौचास जाणे टाळा व शौचालयाचा वापर चालू करा,असे आवाहन जत भाजपातर्फे करण्यात येत आहे.गावोगावचे सरपंच,ग्रामसेवक,ग्रा.प.सदस्य यांनी याबाबत आपापल्या गावांमध्ये प्रबोधन करावे व उघड्यावर शौचास जाण्यास प्रतिबंध करावा असे आवाहन सुनिल पवार यांनी केले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.