Header Ads

कोरोना : जत तालुक्यात इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करून लक्ष द्या : माजी आमदार विलासराव जगताप

 जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या फैलाव होण्याचा काळ आता सुरु आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व यंत्रणानी सतर्क राहण्याचे आवाहन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.


माजी आमदार जगताप म्हणाले,जत तालुक्यात इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य यंत्रणांनी लक्ष ठेवण्याची खबरदारी घ्यावीदेशभर वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणांनी कोणतीही हयगय न करता,सतर्क रहावे.तालुक्यात इतर ठिकाणी रोजगारासाठी असलेले नागरिक मोठ्या संख्येने तालुक्यात परतले आहेत.यात कोरोनाचा प्रभाव असलेल्या भागातीलही काही नागरिक आहेत.त्यांची तपासणी करण्याबरोबर त्यांच्यावर आरोग्य यंत्रणांनी लक्ष ठेवावे.कोणत्याही प्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत अशा पध्दतीने काम करावे.तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व सुचना पाळाव्यात असे आवाहन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले. 


कोरोनाच्या या लढाईत जे अधिकरी, कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत.त्यांच्या सुचनाचे सर्वांनी या गंभीर परिस्थिती पालन करावे.कोरोना विषाणू हा गंभीर साथ आहे.जगभरात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.आपल्या देशात हे सर्व आवाक्यात आहे.त्याचा फैलाव होऊ नये यासाठी तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी.अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका,घरात रहा,असेही आवाहन जगताप यांनी केले.  


Blogger द्वारे प्रायोजित.