Header Ads

गोंधळेवाडी | श्रीसंत बागडेबाबा मठात पोलिसांना नाष्टा चहा जेवणाची व्यवस्था | तुकाराम महाराज यांचा उपक्रम


संख,वार्ताहर : कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर जत तालुक्यात गावोगावी बंदोबस्त, कर्तव्य बजवणारे जत व उमदी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीसांना गोंधळेवाडी(ता.जत) येथील श्रीसंत बागडेबाबा मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम महाराज यांनी नाष्टा,जेवण कर्तव्याच्या ठिकाणी देण्याचे काम सुरु केले आहे.पोलिसांना मास्कही देण्यात आले.कोरोना विषाणुजन्य हे धुमाकूळ घातला आहे.गावात संचारबंदी,लाँकडाऊन वेळी लोकांना घरात थांबण्यासाठी,गर्दी टाळण्यासाठी,लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम पोलीस कर्मचारी रस्त्यावर भर उन्हात तान्हात कर्तव्य बजावत आहेत. गावातील हाँटेल,चहाची टपरी,खानवळ बंद आहेत. जत, उमदी पोलिस ठाण्यापासून गावे लांब आहेत. त्यामुळे पोलिसांच्या जेवणाचे चहापाण्याचे आबाळ होत होते.उपाशी राहत असल्याचे लक्षात घेता जत व उमदी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीसानां चहा ,नाष्टा, जेवण देण्याचा संकल्प केला आहे. बागडेबाबा मंगल कार्यालयात ही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल त्या ठिकाणी नाष्टा, जेवण पोहच देणार आहे.तसेच उमदी पोलिस ठाण्यातील 25 पोलिसांना मास्क देण्यात आली.अशी माहिती तुकाराम महाराज यांनी सांगितले.यावेळी मठात  हवालदार सुनिल गडदे, पोलीस कॉन्सटेबल इंद्रजित गोदे,ह.भ.प.तुकाराम महाराज उपस्थित होते.


 


 


Blogger द्वारे प्रायोजित.