Header Ads

संख | डॉ.आर.के.पाटील यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार


 

 

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील माजी सभापती तथा श्री.शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर.के.पाटील यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मलिकसाब मुल्ला यांच्याहस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.आर.के.पाटील म्हणाले,समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याची पोहचपावती मला या निमित्ताने मिळाली आहे.या परिसरातील प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे.नोकरी,उद्योग धंद्यातून तो सक्षमपणे उभा राहिला पाहिजे हे ध्येय ठेवून मी काम केले आहे.या शैक्षणिक संस्थामधून देशात कुठेही टिकेल असा विद्यार्थी घडविण्याचे शिक्षण यापुढे मिळेल.या भागाच्या सर्वागिंन विकासासाठी उर्वरित आयुष्य खर्ची करू असेही शेवटी पाटील म्हणाले.  मुस्लिम समाजाचे प्रमुख माजी सैनिक अब्बास सैय्यद,मलिकसाब मुल्ला, सोसायटीचे व्हाईस चेअरमन मैनुद्दीन जमादार, आर.बी.पाटील ,संखच्या सरपंच सौ.मंगलताई पाटील,इजि.श्रीकांत पाटील,तम्माराव बागेळी , बी.जी.फुटाणे,विजय बिरादर,मल्लिकार्जुन जिगजेणी,हणमंतराया पाटील,रमजान शेख,गुरूबसु वाघोली,रफिक ममदापुर,राजेभक्षर जमादार,डॉ.दयानंद वाघोली,रमजान जमादार कासीम मुल्ला,मुन्ना शेख,रियाज जमादार,युनूस जमादार,मुनिर मुल्ला,व समाजातील मान्यवर उपस्थित होते.                
 

 

संख डॉ.आर.के.पाटील यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 


Blogger द्वारे प्रायोजित.