Header Ads

कवटेमहाकांळ | मोहन माळी स्कूलच्या सचिव नेहा माळी समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत


 

कवठेमहांकाळ : अभिनव फौंडेशन संचलित मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या सचिव सौ.नेहा माळी यांना राज्यस्तरावरील जयगंगातारा सांस्कृतिक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 'समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी चित्रपट सृष्टीचे नामांकित दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड,अभिनेत्री प्रतिक्षा पाटील,विलास वरपे,संस्थापक मोहन माळी,स्कूल को.ऑर्डिनेटर अरुण अब्राहम आदी मान्यवर उपस्थित होते. 

 मराठी चित्रपट सृष्टीचे नामांकित दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सन्मान करत समाजभूषण पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये मोहन माळी स्कूलच्या सचिव सौ.नेहा माळी यांनी गेल्या काही वर्षात मोहन माळी शैक्षणिक संकुलात मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबर समाजिक दायित्व स्विकारत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.कृतार्थ जीवनातील कर्तृत्व व सर्वगुणसंपन्न अशा वाटचालीवर,कार्यावर उमटलेली  लोकमान्यतेचीच गौरवशाली मुद्रा आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य निरंतर वृद्धिंगत व्हावे.त्यांच्या गुणवत्तेबद्दल आदर राखला जावा.त्यांच्या अंतःकरणाला प्रेरणा मिळावी या हेतूने हा पुरस्कार प्रदान करुन गौरवित केले. समाजातील विविध स्तरावरुन सौ.नेहा माळी यांचे अभिनंदन होत आहे.

 

 

मोहन माळी स्कूलच्या सचिव नेहा माळी यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
 


Blogger द्वारे प्रायोजित.