Header Ads

वाषाण | बेकायदा बैलगाडी शर्यती भरविल्या ; संयोजकासह 30 जणाविरोधात गुन्हा दाखल |

 


 

जत,प्रतिनिधी : वाषाण ता.जत येथे बंदी असतानाही गर्दी जमवून बिगर परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पाच संयोजकासह सुमारे 30 अनओळखी बैलगाडी चालकाविरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला.भाऊ तातोबा वगरे,स्वप्निल उर्फ बारक्या धिंडे (दोघे,रा.वाषाण),प्रकाश गडदे (रा.बाज),नितिन निकम (रा.रामपूर),शंकर सखाराम सरगर (रा.वाषाण)पीकअप क्र.एमएच 06,बिजी- 5100, त्याचा चालक कुमार येदू जाधव रा.रामपूर, छोटा हत्ती एचएच 10,बीआर-0225, इरफान मौला शेख रा.कंठी,20 बैलगाडी चालक,बैलांना उसकण्याकरिता मोटार सायकलीवरून त्यांचा पाठलाग करणारे सुमारे 30 अनओळखी पुरूष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.छाप्यात मोटर सायकली व बैलगाड्या तसेच 2 बैल व 1 घोडा,पीकअप गाडी- छोटा हत्ती असा एकूण 9,41,000रु./- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,वाषाण गावी पुजारी पट्टी मळ्याजवळ बेकायदा बिगर परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून तेथे लोकांची गर्दी जमलेली आहे.अशी बातमी खबऱ्याकडून मिळाल्याने पो.नि.राजाराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक महेश मोहिते यांनी वाषाणचे पोलीस पाटील,सरपंच,ग्रामसेवक यांच्यासह,पोलीस पथकांने वाषाण गावापासून एक कि.मी.अंतरावर पश्चिम बाजूच्या वाषाण ते बेंळूखी रोडला पुजारी पट्टी मळ्याजवळ सरगर वस्ती येथे छापा टाकत कारवाई केली.याप्रकरणी गाडीचालकासह पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक महेश मोहिते करत आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.