Header Ads

माडग्याळ | परिसरात देवी सदृश आजाराने मेढी व्यवसाय धोक्यात


 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील माडग्याळ परिसरात देवीच्या आजाराने विविध शेतकऱ्यांच्या सुमारे 100 मेढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशु पालक भयभीत झाले आहेत.दुष्काळाने मेटाकुटीला आलेले माडग्याळ परिसरातील शेतकऱ्यांचा पशुपालन विशेष करून मेढीपालन हा जगण्याचा आधार आहे.मात्र गेल्या काही दिवसापासून देवीसदृष़्य आजाराने मेंढ्या दगावत आहे.पशु संवर्धन विभागाकडून विशेष तपासणी मोहिम काढून हा रोग रोकावा अशी मागणी पशूपालक शेतकऱ्यांनी केली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.