Header Ads

जत | तालुक्यातील सनमडी व संख येथे मोफत आरोग्य शिबीर | सभापती जगताप व पवार यांची माहिती


 




जत तालुक्यातील सनमडी व संख येथे मोफत आरोग्य शिबीर

 

सभापती जगताप व पवार यांची माहित

 

जत,प्रतिनिधी : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व  स्वर्गीय नारायणराव सुबराव जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य महाशिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर 6 मार्चला सनमडी व 9 मार्चला संख येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे,अशी  माहिती सभापती मनोज जगताप व  महिला व बालकल्याण सभापती सुनीता  पवार यांनी दिली.

सभापती जगताप व पवार म्हणाले  की,जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,उपचारात्मक, संवर्धनात्मक आरोग्यसेवा दिल्या जात आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर बालरोग, स्त्रीरोग,अस्थीरोग,नेत्ररोग,कान, नाक,घसा,त्वचारोग आदी  सेवा उपलब्ध होत नसल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात.नागरिकाना सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक समस्यां निर्माण होतात. जनतेस सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मिळाव्यात या हेतूने विविध तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून जत तालुक्यामध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोफत औषधोपचार वैद्यकीय तज्ञामार्फत सल्ला देऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये बालरोग,स्त्रीरोग,अस्थीरोग,नेत्ररोग ,कान-नाक-घसा वैद्यकशास्त्र शल्यचिकित्सक, त्वचारोग आदी आजारांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या शिबीरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालये, एच.एल.एल.लॅबोरेटरीचा सहभाग घेण्यात आला आहे.तरी सर्व गरजू रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन सभापती मनोज जगताप,सभापती सुनीता पवार यांनी दिली.




 


Blogger द्वारे प्रायोजित.