Header Ads

जत | महामार्गाचे मुळ मोजणीला कलाटणी | काम नियमबाह्य होऊ देणार नाही,माजी आमदार जगताप यांचा इशारा


 




महामार्गाचे मुळ मोजणीला कलाटणी 

 

काम नियमबाह्य होऊ देणार नाही,माजी आमदार विलासराव जगताप यांचा इशार

 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गाचे काम नँशनल हायवेच्या नियमानुसार करण्यात यावे,पाच्छापूर नजिक झालेले निकृष्ट काम नव्याने करावे,अन्यथा काम करू देणार नाही असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला.माजी आमदार जगताप यांनी महामार्गाचे कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी माजी आमदार जगताप यांनी थेट रस्ता कामाची उपस्थित अभिंयत्यांना मोजणी करायला लावली.नियमापेक्षा कोणतेही काम कमी करायचे नाही,अशा कडक सुचना यावेळी जगताप यांनी दिल्या.

जत शहरातील सोनलकर चौक ते चडचण रोड पर्यतचे काम सुरू आहे.कामाचे मुळ अंदाज पत्रकानुसार काम न करता महामार्गाची रुंदी कमी करण्यात आल्याचे आरोप जगताप यांचे आहेत.त्यामुळे त्यांनी मंगळवारी सकाळी सोनलकर चौक ते निगडी चौकापर्यत सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.त्यात मुळ अंदाज पत्रक सोडून काम होत असल्याचे उपस्थित अंभियत्याच्या निदर्शनास आणून दिले.थेट पट्टी टाकून समोर मोजण्यास लावले.त्यानुसारच काम करावे अशा सुचना दिल्या.लगतच्या ज्या नागरिकांची पक्की घरे जाणार आहेत.त्यांना नुकसान भरपाई द्यावी,निगडी चौक ते चडचडण रोड पर्यतचे काम करताना गटारीचे प्रांरभी काम करण्यात यावे.सुरू कामाचे मुळ मोजणी पेक्षा रुंदीकरण कमी करण्यात आले आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून घेत नव्याने मोजमाफ घ्यावे.तोपर्यत चडचडण रोड कडून काम सुरू करावे अशा सुचना यावेळी माजी आमदार जगताप यांनी दिल्या.

पाच्छापूर नजिक झालेले काम निकृष्ट झाले आहे.आताच रस्त्याला भेगा पडल्याने ते काम पुन्हा करावे,असेही यानी जगताप यांनी सांगितले.

यावेळी रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,रासपचे अजित पाटील,दिनेश सांळुखे,ठेकेदारकंपनीचे अभिंयते उपस्थित होते.

 

जत शहरातील महामार्गाच्या कामाची पाहणी करताना माजी आमदार विलासराव जगताप




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.