Header Ads

सांगली | सख्या आईच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप : घटना जत तालुक्यातील बाजची

सख्या आईच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

आरोपी जत तालुक्यातील बाजचा

सांगली : किरकोळ कारणावरून सख्या आईचा विळ्याने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी किरण रायाप्पा बंडगे वय-25,रा. बाज,ता. जत, जि. सांगली याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आरोपी किरण रायाप्पा बंडगे याने त्याची सख्खी आई नंदाबाई रायाप्पा बंडगे हिचा विळ्याने वार खून केल्याप्रकरणी भा.दं. वि. स. कलम 302 अन्वये दोषी

धरुन जन्मठेप व रक्कम रुपये 5,000/- दंड, दंड न दिल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच वडील रायाप्पा विठोबा बंडगे व आजी वैजंताबाई यांचा खून

करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा. दं. स. कलम 307 अन्वये दोषी धरुन तीन वर्षे सक्त मजूरी व रक्कम रुपये 5,000/- दंड व दंड न दिल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अरविंद रामराव देशमुख यांनी काम पाहिले.

थोडक्यात हकीकत अशी की, हा गुन्हा जानेवारी 2016 बाज,ता.जत येथे आरोपीच्या घरात घडला होता. यातील आरोपीचे वडील रायाप्पा विठोबा बंडगे हे त्यांची बायको नंदाबाई व तीन मुले शरद,मोहन व आरोपी किरण,त्यांची आई वैजयंता,मोठी सुन कमल, नात अमृता, नातु आदित्य यांचेसह एकत्रात बाज येथे राहत होते. रायाप्पा यांचा मोठा मुलगा शरद त्याची बायको कमल व नातू आदित्य हे उसतोडीसाठी कवठेपिरान येथे गेले होते. दुसरा मुलगा मोहन हा टॅक्टर चालक म्हणून बाज येथेच कामास होता.तर तिसरा मुलगा किरण म्हणजे आरोपी हा काहीही कामधंदा न करता घरात बसून असायचा. किरण हा लहानपणा पासूनच रागीट व भांडखोर स्वरुपाचा होता. त्याला कोणी काही सांगितलेले पटत नव्हते व त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांचे अंगावर मारण्यास जात होता. घटनेच्या दिवशी सायकांळी 5.00 वाजता त्याची आई नंदाबाई ही आरोपी किरण यास “एवढा मोठा झालास, तुला कळत नाही का टॉवेलने हात पाय पुसायचे सोडून परकरने हातपाय पुसतोस काय? "अशी म्हणाली. त्याचा आरोपी किरण यास राग आला व त्याने रात्री 10.30 वाजता जेवण खान झाल्यानंतर व घरातील सर्वजण झोपल्यानंतर आई नंदाबाई विळ्याने तिच्या छातीवर, पाठीवर व मनगटावर वार केले. त्यावेळी आरोपीची आजी वैजयंतामाला जागी होत आरडा-ओरडा सुरु केला.त्यामुळे आरोपीचे वडील रायाप्पा हे देखील जागे झाले. त्यावेळी त्यांनी पाहिले की, किरणच्या हातामध्ये माखलेला विळा होता व त्यांची बायको नंदाबाई ही रक्ताच्या थारोळयात पडलला होती.त्यावेळी रायाप्पा यांनी किरण यास तु हे काय केलेस असे म्हणाले असता किरण याने वडीलांना "म्हाता-या तुलापण आता जिवंत सोडत नाही" असे म्हणून हातातील विळ्याने त्यांचे मानेवर वार केला व दुसरा वार करणार तेवढ्यात मुठीतून

विळा निखळून खाली पडला. त्यानंतर रायाप्पा हे आरडा-ओरडा करीत घराबाहेर आले. त्यामुळे त्यांचे शेजारील लोक गोळा झाले. त्यांनी नंतर घरात जावून

पाहिले असता, किरण व त्याची आजी वैजयंता यांचेत झटापट चालू होती व त्यामध्ये किरण याचे वैजयंता हिचे डोक्यात कु-हाडीने घाव घातला. त्यानंतर त्याची आजी वैजयंता ही देखील पळून घराबाहेर आली. त्यानंतर शेजारील लोकांनी रायाप्पा व वैजयंता यांना जत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांचेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे दाखल केले. त्यानंतर आरोपीचे वडीलांचा पोलीसांनी दवाखान्यात जबाब नोंदविला. सदर जबाबाच्या आधारे आरोपीविरुध्द खूनाचा व खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा नोंद केला. सदर गुन्हयाचा तपास जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक सोनवलकर यांनी केला.त्यांनी तात्काळ पंचासमक्ष घटनास्थळाचा भेट देवुन घटनास्थळ पंचनामा केला.मयत नंदाबाई हिचा मृत्तदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.आरोपीने गुन्ह्यात वापरलेला विळा व कु-हाड जप्त केली.आरोपीस तात्काळ अटक केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे तपास टिपणे नोंदविली व गुन्ह्याचा सखोल तपास करुन यातील आरोपीविरुध्द मे. कोर्टात आरोपपत्र दाखल केले. सदर केसची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटीलसो यांचे न्यायालयात सुरु होती. याकामी सरकारपक्षातर्फे एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले होते.त्यामध्ये आरोपीची आजी वैजयंता, पंच साक्षीदार व वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी पराव्याच्या आधारे में कोर्टाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Blogger द्वारे प्रायोजित.