Header Ads

मुंबई | वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी लवकरच व्यापक बैठक घेऊ : कामगार मंत्री 
 

 


 

मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांची असंगठीत कामगार म्हणून नोंदणी करणे, कल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करणे यासह वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांसाठी सर्व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी दिले. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानभवनमध्ये श्री वळसे पाटिल यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी श्री वळसे पाटील यांनी बैठकीचे आश्वासन दिले. 

 


 

आमदार श्री केळकर यांच्यासह राज्य संघटना अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सरचिटणीस बालाजी पवार, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, ठाणे जिल्हा अध्यक्ष दत्ता घाडगे, दहिसर अध्यक्ष सदा नंदूर यांनी विधानभवनमधील नामदार वळसे पाटील यांच्या दालनात भेट घेतली.वृत्तपत्र कल्याणकारी योजनांसाठी अभ्यास समितीने बनवलेला अहवाल व मागण्यांचे निवेदन श्री वळसे पाटिल यांना देण्यात आले. 

आमदार श्री केळकर यांनी सांगितले की, असंघटीत कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा झाल्यानंतर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राबवण्याच्या विविध योजनांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीने आपला अहवाल तयार केला आहे. शासनासही तो अहवाल सादर करण्यात आला आहे. 

सुमारे दोन वर्षांपूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांसह असंघटीत क्षेत्रातील कामगार वर्गासाठी सुरक्षा मंडळाची घोषणा केली. त्यानंतर अभ्यास समिती नेमली.अभ्यास समितीने अहवालही सादर केला आहे. आता अभ्यास समितीचा अहवाल स्विकारून त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी श्री केळकर यांनी केली.

 

 
 
 

Attachments area

 


  Blogger द्वारे प्रायोजित.