Header Ads

डफळापूरातील सलून दुकाने 21 ते 28 मार्च दरम्यान बंद


 

जत,प्रतिनिधी : सध्या जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतातही त्यातही महाराष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्य सरकारने त्याच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केलेल्या आहेत.त्याचसाठी सकल नाभिक समाज बांधवांच्या व समाज हितासाठी सर्व नाभिक बांधवांनी दि 21/3/2020 ते 28/3/2020 पर्यंत डफळापूर परिसरातील सर्व सलून दुकाने बंद करण्याच्या एकमताने निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बऱ्याच दक्षता घेण्याचे आवाहनही केंद्र तसेच राज्य सरकारनेही केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जमाव बंदी, एकमेकांच्या संपर्कात न येणे अश्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक असल्याने सलून दुकाने बंद करण्याच्या निर्णय नाभिक समाज बांधवांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून घेण्यात आलेला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी दि. 21 मार्च 2020 ते दि.28 मार्च 2020 पर्यंत सलून दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. नाभिक बांधवांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी नाभिक समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.