Header Ads

जत नगरपालिका सभापतीच्या निवडी रद्द करा | सत्ताधारी गटाचे नगरसेवक लक्ष्मण ऐडके यांची मागणी जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका विषय समिती सभापती पदांच्या निवडणुका चुकीच्या व बेकायदेशीररित्या घेण्यात आलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना नावात चूक झाली आहे. या निवडी रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टिम एडके यांनी सभेत केली.यासंदर्भात ठराव करून तुमच्या भावना शासनाला कळविण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांनी दिले.सत्ताधारी गटातीलच नगरसेवकांने अशी मागणी केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.विषय समितीच्या निवडीसाठी नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षी महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा हिशेब मागूनही दिला जात नाही, अशी तक्रार विरोधी गटातील नगरसेवकांनी सभागृहात केली. यावर मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी हा खर्च नगराध्यक्षा बन्नेनवार यांनी व्यक्तिगत स्वरूपात केला आहे. नगरपालिकेचा कोणताही खर्च केला नाही. आपण लेखी मागणी केली, तर त्यासंदर्भात लेखी उत्तर दिले जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले.


जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका विषय समिती सभापती पदांच्या निवडणुका चुकीच्या व बेकायदेशीररित्या घेण्यात आलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना नावात चूक झाली आहे. या निवडी रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टिम एडके यांनी सभेत केली.यासंदर्भात ठराव करून तुमच्या

भावना शासनाला कळविण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांनी दिले.सत्ताधारी गटातीलच नगरसेवकांने अशी मागणी केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.विषय समितीच्या निवडीसाठी नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षी महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा हिशेब मागूनही दिला जात नाही, अशी तक्रार विरोधी गटातील नगरसेवकांनी सभागृहात केली. यावर मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी हा खर्च नगराध्यक्षा बन्नेनवार यांनी व्यक्तिगत स्वरूपात केला आहे. नगरपालिकेचा कोणताही खर्च केला नाही. आपण लेखी मागणी केली, तर त्यासंदर्भात लेखी उत्तर दिले जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले.

Blogger द्वारे प्रायोजित.