Header Ads

जत एसटी डेपोत कोरोनाचा खबरदारीत उदाशीनता विक्रम ढोणे यांचा आरोप


 





जत एसटी डेपोत कोरोनाचा खबरदारीत उदाशीनता
 

विक्रम ढोणे यांचा आरो



 
जत,प्रतिनिधी : कोरोना व्हायरसचा 

जत तालुक्यात आतापर्यंत एक रूग्ण आढळला नसला तरी जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळणारे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जारी केल्या. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्यतो प्रवास टाळा असेही निर्देश देण्यात आले.असे असतानाही जत एसटी डेपोमध्ये कोरोनाबाबत प्रवाशांची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. तर प्रवाशांना नेहमीप्रमाणे कोंबून नेण्याचे प्रकार सुरूच असल्याचे बुधवारी सर्वत्र दिसून आले.

जत आगारातून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये दररोज 80 च्या आसपास बसेस सोडल्या जातात. कोरोना व्हायरसचा देशात धुमाकुळ सुरू असतानाही राज्य परिवहन महामंडळाने आतापर्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध ठिकाणी जागृती फलक लावण्यात आले. मात्र गर्दीचे ठिकाण असलेल्या जत बसस्थानक परिसरात खबरदारी म्हणून प्रयत्न सुरू केले नसल्याचा आरोप युवक नेते विक्रम ढोणे यांनी केला आहे.

आगारातून बसेस बाहेर सोडण्यापूर्वी सॅनिटायझर मिश्रीत पाण्याने स्वच्छता केली जात नाही. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिक बाहेरगावी जाणेच टाळत आहेत. एसटी महामंडळाची बस दिवसापासून 40-50 प्रवासी घेऊन येत असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे जत बसस्थानक परिसरातील प्रवाशांची गर्दी ओसरली आहे. बसफे ऱ्यांना मोठा प्रतिसाद नाही. सद्य:स्थितीत सर्वच बसेस सुरू असल्या तरी लांब पल्ल्याच्या बसेसचे परतीचे आरक्षण वाढल्याची माहिती वाहन चालकांनी दिली. खासगी बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली. जिल्हा प्रशासनाने जीवनाश्यक वस्तुंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

 

जत बसस्थानकात खबरदारी नाही 

 

राज्यभरात कोरोना विषाणूमुळे भितीचे वातावरण पसरले आहे.सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. मात्र याला जत बसस्थानक अपवाद उरले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत बसस्थानकात कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाही.स्वच्छता, तपासणी,खबरदारी साठी बसेसची स्वच्छता अशा कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाहीत.

त्यामुळे बसस्थानकातून करोनोचा एकदा रुग्ण तालुक्यात आलाच तर दोष कुणाला द्यायचा असा आरोपही ढोणे यांनी केला.






 


Blogger द्वारे प्रायोजित.