तिप्पेहळ्ळीत महिलेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 




 

तिप्पेहळ्ळीत महिलेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील तिप्पेहळळी येथील एका 30 वर्षाच्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिप्पेहळळीतीलच आशिष आनंदराव शिंदे याच्यां विरुध्द जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,संशयित आशिष शिंदे याने सदर महिलेच्या घरात कुणी नसताना प्रवेश केला.पिडित महिलेच्या तोंडावर हात ठेऊन तू मला खूप आवडतेस,आत्ता तुला कोण वाचविणाऱ नाही असे म्हणून अंगाशी झोबाझोबी करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.संशयितास अद्याप अटक करण्यात आली नाही आधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल माळी करीत आहेत.