Header Ads

एकुंडी | म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईप लाईनला एकुंडीत 7 ठिकाणी चेंबर सोडा | सरपंच बसवराज पाटील यांची मागणी




 

 

जत,प्रतिनिधी : एकुंडी ता.जत येथून म्हैसाळ पाणी योजनेचे बंदिस्त पाईप लाईनचे काम प्रगतीपथावर असून या पाईप लाईन मधून एकुंडी गावातील शेतीसाठी पाणी पुरवठ्यासाठी एकुंडी हद्दीत सात ठिकाणी चेंबर सोडण्यात यावेत,अशी मागणी सरपंच बसवराज पाटील यांनी केली आहे. 

बहुचर्चित व बहुउपयोगी अशी असणारी म्हैसाळ योजनेतून वंचित असलेले मिरवाड,जिरग्याळ, एकुंडी, वज्रवाड व गुगवाड या गावांचा म्हैसाळ योजनेत तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांनी समाविष्ट केले आहे.सध्या या गावांसाठी बंदिस्त पाईप लाईनचे काम मिरवाड तलाव येथून लिप्ट करून सुरु आहे.या पाईपलाईनमधून जिरग्याळ, एकुंडी,वज्रवाड मार्गे गुगवाड पर्यंत पाणी जाणार आहे. एकुंडी गावाच्या हद्दीतील पाईप लाईन काम सध्या पूर्ण होत आले आहे.या पाईप लाईनला एकुंडी हद्दीत जिरग्याळ डांबरी रोड जवळ, गुड्डोडगीवस्ती रोड जवळ,ओढा पात्रावर, वळसंग वस्ती जवळ, कोट्टलगी वस्ती जवळ,पाटील वस्ती जवळ व वज्रवाड डांबरी रोड जवळ अशा सात ठिकाणी चेंबर सोडण्याची मागणी एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. आता सध्या या योजनेचे काम चालू आहे.तोपर्यंतच एकुंडी हद्दीत चेंबर सोडावेत अन्यथा एकुंडी गावातील शेतकरी पुढील पाईप लाईन होऊ देणार नाहीत.असा इशारा सरपंच बसवराज पाटील यांनी दिला आहे.

 

एकुंडी येथे टाकण्यात येत असलेली बदिस्त पाईपलाईन  






Blogger द्वारे प्रायोजित.