Header Ads

शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करा | शिक्षक भारतीचे बिडिओना निवेदन |


 
शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करा 

 

 

शिक्षक भारतीचे बिडिओना निवेदन

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत अशी मागणी जत तालुका शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली. तसे निवेदन गटविकास अधिकारी अरविद धरणगुत्तीकर निवेदन यांना देण्यात आले.

निवेदनात म्हणले आहे की,तालुक्यातील 


राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे वेतन झाले तर स्टेट बँक द्वारा चालू असलेल्या स्टेट गव्हमेट सॅलरी पॅकेजचे फायदे होतात

झीरो बॅलन्स झाल्यास कोणतेही चार्जेस लागत नाहीत.कोणत्याही बँकेच्या एटीएम वरून पैसे कितीही वेळेस काढल्यास चार्जेस लागत नाहीत.मागणी नुसार क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते.

20 लाख रुपये पर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते.पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, शैक्षणिक लोन यावर व्याजदरात सूट मिळू शकते.

बँकेत लॉकर चार्जेस मध्ये 25 टक्के सूट

बँकेत जमा रक्कम ईमोडद्वारे डिपॉजिट होऊन जमा रक्कमेवर व्याज जास्त मिळते.डीडी काढणे,चेक बुक,एसएमएस सेवा आणि सर्व ऑनलाईन व्यवहारावर कोणतेही चार्जेस लागत नाहीत.कर्मचाऱ्यास 2 महिन्याच्या पगारी एवढा ओहरडॉप्ट मागणी नुसार देईल असे अनेक फायदे शिक्षकांना होणार आहेत.

यावेळी तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत,मल्लया नांदगाव,नवनाथ संकपाळ,अविनाश सुतार,जितेंद्र बोराडे,रावसाहेब चव्हाण,एच.के.मुल्ला इ.पदाधिकारी उपस्थित होते.


 

जत तालुक्यातील शिक्षकांचे पगार शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावे असे निवेदन देण्यात आले.
 


Blogger द्वारे प्रायोजित.