Header Ads

करोनोचा फटका | गुड्डापूरचे श्री.दानम्मादेवी मंदिर इतिहास प्रथमच बंद |

 


 


जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र, कर्नाटकासह आंध्रप्रदेश मधील भाविकाचे श्रंध्दास्थान असलेले गुड्डापूर ता.जत येथील श्री.दानम्मादेवी मंदिर करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील सुचना येईपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.अन्नदासोह ही बंद ठेवण्यात आले आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्ट,भक्त मंडळ,ग्रामपंचायतीची बुधवार बैठक झाली.त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.इतिहासात मंदिर ठेवण्याची पहिलीच घटना आहे.देवीच्या दर्शनासाठी तिन्ही राज्यातील भाविक येतात.करोनोचा अनेक ठिकाणी प्रभाव वाढत आहे.त्यामुळे करोनोच्या विषाणु रोकण्यासाठी प्रतिबंधित खबरदारी म्हणून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश गणी,चंद्रशेखर गोब्बी,व सचिव विठ्ठल पुजारी यांनी सांगितले.


Blogger द्वारे प्रायोजित.